भुशी धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू   

पिंपरी : लोणावळाजवळ असलेल्या भुशी धरणात बुडून दोन पर्यटक तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. साहिल अश्रफ अली शेख (वय-१९), महमद जमील (वय-२२, सध्या रा. थेरगाव, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
 
साहिल आणि जमील हे दोघे काल सकाळी लोणावळा परिसरातील भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये फिरण्यासाठी आले होते. दोघेही दुपारी धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना माहिती मिळताच त्यांनी शिवदुर्ग मित्र या पथकाला पाचारण केले. 
 
शिवदुर्गचे महेश मसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक, महादेव भवर, राजेंद्र कडू, अनिल आंद्रे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
 

Related Articles